घरात पैसा टिकत नाही? करा लिंबाचा 'हा' उपाय, होईल भरभराट
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की दुकानदार किंवा व्यावसायिक त्यांच्या तिजोरी जवळ काचेच्या ग्लासात लिंबू ठेवतात. परंतु ते असं का करतात याविषयी तुम्हाला माहितीये का?
लिंबू काचेच्या ग्लासात ठेवणं यामागे ज्योतिषीय कारण आहे. व्यवसायात यश मिळण्यासाठी प्रामुख्याने हा उपाय केला जातो.
लिंबूला धार्मिक कार्यात महत्व असते. लिंबू नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. त्यामुळे आसपासचं वातावरण शुद्ध आणि सकारत्मक होतं.
ज्योतिष अभ्यासकांच्या सांगण्यानुसार लोक त्यांच्या घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी काचेच्या ग्लासात लिंबू ठेवू शकतात यामुळे सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
लिंबू पाण्यात ठेवल्यामुळे यश मिळते असे म्हणतात. अधिकतर दुकानदार लिंबू त्यांच्या दुकानातील गल्ल्याजवळ ठेवतात. यामुळे लिंबू आणि पाण्याची ऊर्जा पैसे आकर्षित करते. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते.
काचेच्या ग्लासमध्ये लिंबू आणि पाणी ठेवल्याने तुमच्या पैशांना आणि व्यवसायाला वाईट नजर लागणार नाही.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)