सध्या कोल्हापुरी चप्पल पुन्हा एकदा चर्चेत आलीये. इटालियन कंपनी प्राडाने कोल्हापूर चप्पल सारखी दिसणाऱ्या चपलांचं उत्पादन करून ते आपल्या नावावर विकतय. त्यामुळे प्राडा कंपनीवर भारतातून सध्या टीकेची झोड उठतेय.
सध्या बाजारात विविध प्रकारच्या चपला उपलब्ध असतात. पण कोल्हापुरी चपला घातल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
कोल्हापुरी चपलांचा तळवा हा सपाट आणि पातळ असतो. ज्यामुळे शरीरात रक्त परिसंचरण चांगलं होतं.
कोल्हापुरी चपला या अधिकतर समोरच्या बाजूने खुल्या असतात. ज्यामुळे बोटांना आराम मिळतो.
कोल्हापुरी चप्पल परिधान केली की त्यात पायाचा बहुतेक भाग हा खुला राहतो. ज्यामुळे त्वचेचे आजार असलेल्या लोकांना कोल्हापुरी चप्पल कम्फरटेबल असते.
टाच दुखीची समस्या असेल तर जाड तळवे असलेल्या कोल्हापुरी चपला घातल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)