रुद्राक्ष हे भगवान शिवाच्या अश्रूंनी झाली असल्याची आख्यायिका शास्त्रांमध्ये आहे. त्यामुळे लोक रुद्राक्ष घालताना दिसतात.
रुद्राक्ष विविध प्रकारचे असतात, त्यापैकी सात मुखी रुद्राक्षबाबत तुम्हाला अनेक गोष्टी सांगणार आहोत.
शास्त्रांमध्ये असं म्हटले जाते की सात मुखी रुद्राक्ष धारण केल्याने आर्थिक समस्या दूर होतात.
सोबतच करिअर आणि व्यवसायामध्ये यश मिळू शकतं. सात मुखी रुद्राक्षाचा संबंध हा शनी ग्रहाशी असतो.
त्यामुळे ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनी ग्रह नकारात्मक स्थितीत असतो ती लोक सुद्धा सात मुखी रुद्राक्ष धारण करू शकतात.
सात मुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्यांची श्रीमंती वाढते आणि गुप्तधनाची प्राप्ती होऊन अचानक धनलाभ मिळू शकतो.
सात मुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठी पावसाळ्यातील महिना, तसेच शिवरात्र किंवा सोमवार हे दिवस शुभ मानले जातात.
सात मुखी रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी एका चांदीच्या वाटीमध्ये दूध, दही, मध, तूप, साखर इत्यादी मिक्स करून घ्या. मग या मिश्रणात रुद्राक्ष डुबवा आणि मग १०८ वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करा. त्यानंतर गळ्यात परिधान करा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.