बऱ्याचवेळा रोज भातासह तीच साधी डाळ खाऊन कंटाळा येतो.
अशावेळी कढी पकोड्याची ही सोपी आणि चमचमीत रेसिपी एक उत्तम पर्याय आहे.
यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात बेसन, हळद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घट्टसर मिश्रण तयार करा.
आता कढईत गरम तेलात मिश्रणाचे लहान पकोडे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
दुसऱ्या भांड्यात दही, बेसन, मीठ, हळद आणि पाणी एकत्र करून मिश्रण तयार करा.
कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी द्या.
त्यात हिरवी मिरची घालून परतून घ्या.तयार केलेलं दह्याचं मिश्रण फोडणीत घालून ढवळा.
कढी उकळल्यावर तळलेले पकोडे त्यात सोडा. मंद आचेवर 5-7 मिनिटं शिजवा.
गरमागरम कढी पकोडे मऊ भातासह सर्व्ह करा.