भांग, दारु जास्त झालेय? धुलिवंदनानंतर असा उतरवा हँगओव्हर

Pooja Pawar
Mar 03,2026


3 मार्च रोजी देशभरात धुलिवंदनाचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने अनेकजण चिकन मटणासह दारू आणि भांग पितात.


धूलिवंदन झालं की भांग आणि दारूचा हँगओव्हर कसा उतरवायचा असा प्रश्न पडतो. धुनीवंदननंतर हँगओव्हर उतरवण्यासाठी घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात.


भांग, दारुचा हँगओव्हर उतरवण्यासाठी संत्र्याचा रस प्रभावी ठरू शकतो. संत्र्याच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने मळमळ आणि उलटीपासून आराम मिळतो.


भांग आणि दारूचा हँगओव्हर उतरवण्यासाठी मद्यपान करण्यापूर्वी केळी खाऊ शकता. यामुळे भांग किंवा दारू जास्त चढत नाही.


धुनीवंदननंतर हँगओव्हर उतरवण्यासाठी कॉफीचा पर्याय सुद्धा उत्तम आहे. कडक कॉफी प्यायल्यास हँगओव्हर उतरतो, तसेच डोकेदुखी पासून सुद्धा आराम मिळतो.


भांग आणि दारूचा हँगओव्हर उतरवण्यासाठी तुम्ही नारळ पाण्याचे सुद्धा सेवन करू शकता.


आल्याचा चहा सुद्धा दारूची नशा उतरवण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. तसेच लस्सी सुद्धा हँगओव्हर उतरवण्यासाठी उपयोगी येते.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. याबद्दल अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story