डायबेटिज हा सध्या जगभरात वेगाने वाढणारा आजार आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे डायबेटिज सारखा आजार होता.
जेवल्यावर शुगर लेव्हल वाढण्याचा धोका जास्त असतो. अशावेळी तुम्ही असे काही उपाय करू शकता ज्यामुळे रक्तातील शुगर नियंत्रणात येईल.
तुम्ही जेवणात जे काही खाता त्यात कार्ब्सचे प्रमाण जास्त असले तर त्याचे ग्लूकोजमध्ये रूपांतर होऊन ते रक्तात मिसळतात. त्यामुळे शुगर लेव्हल वाढते.
तेव्हा डायबिटीजच्या रुग्णांनी जेवणातून असे पदार्थ खायला हवेत ज्यात कार्ब्स कमी असतील.
जेवणानंतर वॉकला गेल्याने शरीराची हालचाल होते आणि शुगर लेव्हल नियंत्रणात येते.
डायबिटीजच्या रुग्णांना आहारात हिरव्या भाज्या, फळ इत्यादींचा समावेश केल्यास फायदा होऊ शकतो.
शुगर लेव्हल वाढली असेल तर रुग्णाला पाणी प्यायला द्या ज्यामुळे त्याचे शरीर हायड्रेट राहते.
डायबेटिजच्या रुग्णांनी जास्तवेळ उपाशी राहू नये आणि व्यायाम तसेच योगा करावा.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)