आजारी पडल्यावर आपण फळं आवर्जून खातो.
पण सर्दी आणि खोकल्यादरम्यान केळी खावी का? असा प्रश्न अनेकांना पडतो.
हो, सर्दी आणि खोकल्यादरम्यान केळं खाणं सुरक्षित आहे आणि अनेक वेळा फायदेशीरही ठरू शकतं.
केळ्यामध्ये शरीराला ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन B6, फायबर, आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असतं.
सर्दी आणि खोकल्यादरम्यान शरीर थकलेलं असतं, भूकही कमी असू शकते.
अशावेळी केळं पचायला हलकं असल्याने ते शरीराला लवकर ऊर्जा पुरवते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. )