ट्रेनमधून प्रवास करताना दारू घेऊन जाऊ शकतो का? जाणून घ्या नियम

Published by: Pooja Pawar | Jan 23, 2025

भारतीय रेल्वे हे देशातील प्रमुख दळणवळणाचे साधन आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात.

Published by: Pooja Pawar | Jan 23, 2025

ट्रेनमधून प्रवास करताना प्रवासी सोबत बरंच सामान सुद्धा घेऊन प्रवास करतात. यात अनेकांना प्रश्न पडतो की रेल्वे प्रवास करताना बॅगेत दारू घेऊन जाऊ शकतो का?

Published by: Pooja Pawar | Jan 23, 2025

ट्रेनमधून प्रवास करताना दारूची बॉटल सोबत घेऊन प्रवास करणे किती सुरक्षित आहे याबाबत रेल्वेचे नियम काय म्हणतात याविषयी जाणून घेऊयात.

Published by: Pooja Pawar | Jan 23, 2025

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार ट्रेनमधून दारू घेऊन जाण्यास बंदी आहे. ट्रेनमध्ये सोबत दारू घेऊन जाणं गुन्हा आहे.

Published by: Pooja Pawar | Jan 23, 2025

जर कोणतीही व्यक्ती ट्रेनमधून प्रवास करताना दारू घेऊन जाताना सापडली तर त्याच्या विरुद्ध भारतीय रेल्वे अधिनियम १९८९ चे कलम १६५ नुसार कारवाई केली जाऊ शकते.

Published by: Pooja Pawar | Jan 23, 2025

ट्रेनमध्ये दारू घेऊन जाणाऱ्या व्यक्तीवर 500 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. तसेच काही प्रकरणांमध्ये प्रवासाला ६ महिन्यांचा तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो.

Published by: Pooja Pawar | Jan 23, 2025

प्रवासी ट्रेनमध्ये दारू घेऊन जाताना आढळला तर त्याचे तिकीट रद्द होऊ शकते.

Published by: Pooja Pawar | Jan 23, 2025

भारतीय रेल्वेमध्ये प्रवासी दारू पिऊन किंवा अन्य कोणताही नशा करून प्रवास करू शकत नाही.

Published by: Pooja Pawar | Jan 23, 2025

दारू शिवाय रेल्वे प्रवासादरम्यान गॅस सिलेंडर, स्टोव, फटाके, ज्वलनशील पदार्थ आणि नारळ इत्यादी गोष्टी घेऊन जाण्यास बंदी आहे.

Published by: Pooja Pawar | Jan 23, 2025

VIEW ALL

Read Next Story