कांदा कापताना रडू येतं? 'या' टिप्स वापरल्यास डोळ्यातून येणार नाही पाणी

कांदाशिवाय कुठलाही पदार्थ तयार करता येतं नाही. त्यामुळे कांदा चिरण्यापासून पर्याय नसतो. पण कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं म्हणून अनेक गृहिणीला तो चिरायला आवडतं नाही. पण आम्ही तुम्हाला असं टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या डोळ्यातून अजिबात पाणी येणार नाही.

कांद्यातील एंझाइम्समुळे आपल्या डोळ्यात पाणी येतं. त्यामुळे कायम कांदा हा मुळापासून कापावा त्यामुळे एंझाइमचा प्रभाव कमी होतो आणि आपल्या डोळ्यात पाणी येतं नाही.

कांदा कापण्यापूर्वी चाकूवर लिंबाचा रस लावा त्यामुळे कांद्यातील एन्झाइमचा डोळ्यांवर परिणाम होत नाही.

कांदा कापण्यापूर्वी व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवावा त्यामुळे एन्झाइममुळं डोळे जळजळणार नाही.

कांदा कापण्यापूर्वी ते सोलून काही वेळासाठी फ्रिजरमध्ये ठेवल्यास एन्झाइमचा प्रभाव होतो आणि डोळ्यातून पाणीही येत नाही.

कांदा कापताना तुमच्या आजूबाजूला मेणबत्ती किंवा दिवा लावल्यास एन्झाइम उष्णतेकडे वळते. त्यामुळे डोळ्यातून पाणी येतं नाही. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story