जे लोकं नियमित ट्रॅव्हल करतात त्यांना अनेकदा टेन्शन असतं ते म्हणजे बाहेरच्या खाण्याचं. बाहेरचं अन्न खाल्ल्याने अनेकांना बऱ्याचदा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
आज आम्ही तुम्हाला अशा 6 पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे दोन तीन दिवस खराब होणार नाहीत.
प्रवासादरम्यान तुम्ही पुऱ्या सोबत ठेऊ शकता. पुऱ्या दोन ते तीन दिवस खराब होत नाहीत. सोबत गोड गुलगुले सुद्धा तुम्ही सोबत घेऊ शकता.
प्रवासादरम्यान तुम्ही काजू, बदाम, पिस्ता, मनुके सारखे ड्रायफ्रूट्स सुद्धा सोबत ठेऊ शकता.
लांबच्या प्रवासात खाण्यासाठी तुम्ही पराठे सुद्धा सोबत घेऊ शकता.
लांबच्या प्रवासाला जाताना तुम्ही सोबत खस्ता कचोरी सुद्धा सोबत ठेऊ शकता.
प्रवासादरम्यान तुम्ही चिक्की, तिळाचे लाडू, गजक सुद्धा सोबत ठेऊ शकता.
गुजराती लोकांच्या नाश्त्यात पदार्थ थेपला सुद्धा तुम्ही सोबत घेऊ शकता. थेपला जवळपास आठवडाभर सुद्धा चांगला राहू शकतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)