काजू की बदाम आरोग्यासाठी काय आहे फायदेकारक?

डायफ्रुटमध्ये पावरफूल कोण?

नेहमीच वाद असतो की काजू की बदाम डायफ्रुटमध्ये सगळ्यात जास्त पावरफूल कोण? अशी नेहमीच चर्चा सुरु असते, त्याविषयी जाणून घेऊया.

काजूत असलेले गुणधर्म

काजूत व्हिटामिन के, झिंक आणि अनसॅच्युअरेटेड फॅट असतात आणि हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेकारक ठरतात.

बदाममध्ये असलेले गुणधर्म

बदाममध्ये प्रोटीन, व्हिटामिन ई, अनसॅच्युअरेटेड फॅट आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. जे तुमच्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम करतात.

का खावा काजू?

जर तुम्हाला तुमच्या मेंदूची ताकद वाढवायची असेल तर काजूचा तुमच्या डायटमध्ये समावेश करा.

का खावा बदाम?

तुम्ही जर नेहमी बदाम खाला तर इम्युनिटी सिस्टम चांगली राहिल आणि तुम्ही नेहमी आजारी पडणार नाही.

काजूचे आणखी फायदे

काजू खाल्यानं शरिरातील आयरनची कमी दूर होईल. तर एनीमियाच्या रुग्णांनी काजू खाल्यास त्यांना नक्कीच फायदा होईल.

डॉक्टर काय म्हणतात?

डॉक्टरांच्या मते काजू आणि बदाममध्ये सगळ्यात जास्त पौष्टिक बदाम आहे.

प्रमाणात करा सेवन

काजू आणि बदाम तुमच्या आरोग्यासाठी कितीही फायदेकारक असले तरी त्यांचे प्रमाणात सेवन करा. (All Photo Credit : Freepik) (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story