सेलिब्रिटींच्या ग्लोइंग स्किनचं Secret आलं समोर!

user Diksha Patil
user Oct 19,2024


सेलिब्रिटी त्यांच्या त्वचेसाठी नेमकं काय करतात ज्यामुळे त्यांची त्वचा ही नितळ किंवा ग्लोइंग दिसते.


त्याचं कारण ब्युटी ट्रिटमेंट नाही तर डायट आहे. त्या रोज एक असं ड्रिंक पितात ज्यामुळे त्यांची त्वचा ग्लोइंग राहते.


एक ग्लास पाण्यात 1 - 2 चमचे चिया सीड्स रात्रभर भिजत घाला.


दुसऱ्या दिवशी एक ब्लेंडर घ्या त्यात 1 मोठा आवळा कापून घाला आणि 1 चमचा कोरफडचं जेल आणि 4-5 पुदिन्याची पानं आणि 5-6 तुळशीची पानं घालून त्याला ब्लेंड करा.


त्यानंतर त्याला गाळून घ्या आणि त्यातून निघालेला ज्यूस हा रात्र भर भिजत घातलेल्या चिया सीड्सच्या पाण्यात घालून प्या.


हे ड्रिंक घेतल्यानंतर त्वचेवर कोलोजनचं प्रोडक्शन वाढतं आणि त्यामुळेच डाग, पुरळ आणि सुरकुत्यांसारख्या समस्या कमी होतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story