श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहिलेलं नाही, अशी व्यक्ती शोधून सापडणं कठीण. आजच्या जगात पैशाला असलेलं महत्त्व पाहता प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं आहे.
मात्र श्रीमंत होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला आपल्या सवयींमध्ये काही बदल करणं आवश्यक आहे.
आचार्य चाणक्य यांनी असे चार गुण सांगितले आहेत जे श्रीमंत होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. हे गुण श्रीमंत होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत असंही ते सांगतात.
आपलं लक्ष्य साध्य करण्यासाठी मेहनत करण्याची तयारी असणे हा अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत गुण अंगी असलेली व्यक्तीच श्रीमंत होऊ शकते.
मेहनतीमधून कमवलेलं धन योग्य जागी गुंतवणे महत्त्वाचं असल्याचं चाणक्य सांगतात. पैसा अशा जागी गुंतवला पाहिजे की त्यामधून नफा झाला पाहिजे. तसेच आपला तोटा कुठे आहे याचा अंदाजही व्यक्तीला बांधता आला पाहिजे, तर पैशाचं नीट नियोजन करता येतं.
चाणक्य यांच्या सांगण्यांनुसार, मानवाच्या जीवनामध्ये कधीही कठीण प्रसंग येऊ शकतो. त्यामुळेच त्याच्या अंगी बचत करण्याचा गुण असेल तर अशा परिस्थितीला तो मोठा धैर्याने तोंड देऊन संकटावर मात करु शकतो. बचत करण्याची सवय आत्मसात केली पाहिजे.
छोटे-छोटे आणि फारसे महत्त्वाचे न वाटणारे खर्च मोठ्यात मोठी तिजोरी क्षणात खाली करु शकतात, असं चाणक्य सांगतात. त्यामुळे असे वायफळ खर्च तातडीने थांबवले पाहिजे, असं चाणक्य सुचवतात.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)