चाणक्य नीती: प्रत्येक विवाहित जोडप्याने रात्री बेडवर जाण्यापूर्वी कराव्यात 'या' 5 गोष्टी

Swapnil Ghangale
Apr 21,2025

आचरण कसं असावं

व्यवहारी तसेच वैयक्तिक जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीचं आचरण कसं असावं याबद्दल आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये माहिती दिली आहे.

पाच गोष्टी झोपण्यापूर्वी नक्की कराव्यात

आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक आयुष्याचे काही मंत्रही दिले असून त्यांनी प्रत्येक जोडप्याने रात्री झोपण्यापूर्वी केल्या पाहिजेत अशा पाच गोष्टींबद्दलही भाष्य केलं आहे. त्या कोणत्या ते पाहूयात...

दोघांनी एकत्र जेवण केल्याने...

चाणक्य यांच्या सांगण्यांनुसार, रात्रीचं जेवण नवरा-बायकोनं एकत्रच केलं पाहिजे. असं केल्याने एकमेकांबद्दलचा सन्मान आणि प्रेम वाढतं.

दोघांनी झोपायला जाण्यापूर्वी...

दिवसभराच्या धावपळीनंतर झोपायला जाण्यापूर्वी पती-पत्नीने निवांत गप्पा माराव्यात असंही चाणक्य यांनी सुचवलं आहे. असं केल्याने नातं सुदृढ होण्यास मदत होते.

काळजीपूर्वक ऐकावं

गप्पांदरम्यान पत्नी काही समस्या सांगत असल्याने पतीने ते काळजीपूर्वक ऐकणं फायद्याचं ठरत असं चाणक्य निती सांगते. पत्नीची समस्या सोडवणं ही पतीची जबाबदारी असल्याने इथला हलगर्जीपणा नात्यावर परिणाम करु शकतो.

...तर नात्यात दुरावा

जोडीदाराच्या इच्छेकडे दुर्लक्ष करणं टाळावं. जोडीदाराच्या इच्छेकडे दुर्लक्ष केल्यास नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो, असा इशारा चाणक्य यांनी दिला आहे.

मिठी मारावी

बेडरुममध्ये गेल्यानंतर पती-पत्नीने एकमेकांना मिठी मारायला हवी. मिठी मारल्याने एकमेकांबद्दलचा जिव्हाळा, आपुलकी आणि प्रेम वाढतं, असं चाणक्य सांगतात.

या गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच...

रात्री झोपण्यापूर्वी विवाहित जोडप्याने या पाच गोष्टी केल्यानंतर त्यांना वैवाहिक जीवनामध्ये नक्कीच सुख, शांती लाभेल असं चाणक्य नीती सूचित करते. या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास कलह संभवतो.

माहिती सामान्य संदर्भांवरून

Disclaimer -येथील सर्व माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत.)

VIEW ALL

Read Next Story