Chanakya Niti: 'या' 4 सवयी बदलल्यास तुम्हाला श्रीमंत होण्यापासून देवही रोखू शकत नाही; चाणक्यने सांगितलेले सिक्रेट्स

Published by: Swapnil Ghangale | Aug 10, 2025

प्रत्येकाला श्रीमंत व्हायचंय

आजच्या जगात पैशाला असलेलं महत्त्व पाहता प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं आहे. श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहिलेलं नाही, अशी व्यक्ती शोधून सापडणं कठीण.

Published by: Swapnil Ghangale | Aug 10, 2025

सवयी बदला श्रीमंत व्हा

मात्र श्रीमंत होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला आपल्या सवयींमध्ये काही बदल करणं आवश्यक आहे.

Published by: Swapnil Ghangale | Aug 10, 2025

श्रीमंत होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने....

आचार्य चाणक्य यांनी असे चार गुण सांगितले आहेत जे श्रीमंत होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. हे गुण श्रीमंत होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत असंही ते सांगतात.

Published by: Swapnil Ghangale | Aug 10, 2025

बचत

चाणक्य यांच्या सांगण्यांनुसार, मानवाच्या जीवनामध्ये कधीही कठीण प्रसंग येऊ शकतो. त्यामुळेच त्याच्या अंगी बचत करण्याचा गुण असेल तर अशा परिस्थितीला तो मोठा धैर्याने तोंड देऊन संकटावर मात करु शकतो. बचत करण्याची सवय आत्मसात केली पाहिजे.

Published by: Swapnil Ghangale | Aug 10, 2025

मेहनती असणे

आपलं लक्ष्य साध्य करण्यासाठी मेहनत करण्याची तयारी असणे हा अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत गुण अंगी असलेली व्यक्तीच श्रीमंत होऊ शकते.

Published by: Swapnil Ghangale | Aug 10, 2025

निष्फळ खर्च तातडीने बंद करणे

छोटे-छोटे आणि फारसे महत्त्वाचे न वाटणारे खर्च मोठ्यात मोठी तिजोरी क्षणात खाली करु शकतात, असं चाणक्य सांगतात. त्यामुळे असे वायफळ खर्च तातडीने थांबवले पाहिजे, असं चाणक्य सुचवतात.

Published by: Swapnil Ghangale | Aug 10, 2025

मेहनतीने कमवलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणे

मेहनतीमधून कमवलेलं धन योग्य जागी गुंतवणे महत्त्वाचं असल्याचं चाणक्य सांगतात. पैसा अशा जागी गुंतवला पाहिजे की त्यामधून नफा झाला पाहिजे. तसेच आपला तोटा कुठे आहे याचा अंदाजही व्यक्तीला बांधता आला पाहिजे, तर पैशाचं नीट नियोजन करता येतं.

Published by: Swapnil Ghangale | Aug 10, 2025

माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

Published by: Swapnil Ghangale | Aug 10, 2025

VIEW ALL

Read Next Story