चिकन बिर्याणसोबतच चिकन पुलाव देखील अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे.
झटपट आणि अतिशय सोप्या पद्धतीने चिकन पुलाव तयार करता येतो
सुरुवातीला चिकनला हळद, तिखट, मीठ लावून मॅरिनेट करावे.
फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, खडे मसाले याचा समावेश करावा
गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि पुदीनाची पाने घालावीत.
कुकरमध्ये अवघ्या दोन शिटीमध्ये तयार होणार हा पदार्थ आहे.
फोडणीचं साहित्य तेलात परतून घ्यावे. यामध्ये कसुरीमेथी आणि बडीशेप देखील घालावी.
त्यानंतर आलं-लसूणची पेस्ट फोडणीत वापरावी
मॅरिनेट केलेलं चिकन फोडणीत परतून घ्याव
त्यानंतर तांदूळ घालून ते परतून घ्यावेत आणि प्रमाणात पाणी घालावे
जर तुम्हाला इंद्रायणी तांदूळ आवडत असेल तर तो वापरावा
दोन शिट्यांमध्ये गरमा गरम चिकन पुलाव तयार होईल.