चीनमधील कर्मचारी किती तास काम करतात? चिनी वर्किंग अवर्स पाहून भारतीयांना भरते धडकी

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

कमी दिवसात मोठे प्रोजेक्टस

चीनमध्ये अगदी काही दिवसांमध्ये मोठमोठ्या आकाराच्या इमारती, उड्डाण पूल उभारले जातात. यासंदर्भातील वेगवेगळे व्हिडीओ वेळोवेळी व्हायरल होत असतात.

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

मजूर नेमके किती तास काम करतात?

मात्र असले व्हिडीओ पाहिल्यानंतर, बातम्या वाचल्यानंतर या देशातील मजूर नेमके किती तास काम करत असतील असा प्रश्न पडतो.

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

असा प्रश्न पडणं सहाजिक

इमारत किंवा एखादी वास्तू उभी करण्याचा चीनमधील वेग पाहता असा प्रश्न पडणं सहाजिक आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

आठवड्यातून किती तास काम करायचं? कायदा आणि प्रत्यक्षात फरक

चीनमधील कामगार कायद्यानुसार रोजचे आठ तास किंवा आठवड्यातून 44 तासांपेक्षा अधिक वेळ मजुरांकडून काम करुन घेऊ नये असं सांगितलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

किमान किती तास करुन घेतात काम

मात्र अनेक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, चीनमध्ये मजुरांकडून 12-12 तास काम करुन घेतलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

ओव्हर टाइमचे मोबदला नाही

ओव्हर टाइम केल्यानंतरही चिनी मजुरांना त्याच्या देशात त्या कामाचा योग्य मोबदला दिला जात नाही.

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

एप्रिलमध्ये सर्वांनी किती काम केलं?

चीनमधील राष्ट्रीय सांख्यिक ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशाचा विचार केल्यास एप्रिलमध्ये चीनमधील मजुरांनी आठवड्याला 48.8 तास काम केलं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

वाईट परिस्थितीमध्ये...

सर्वात वाईट परिस्थितीमध्ये काही चिनी मजूर दिवसातील 18 तासही काम करतात.

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

भारतीयांना दिलासा

हा आकडा खरोखर कोणत्याही भारतीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणार आहे. कारण भारतात एवढा काळ काम करुन घेतलं जात नाही.

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

ओव्हर टाइमचा वेळही ठरलेला

चीनमध्ये ओव्हर टाइमचा कालावधी हा दिवसाला जास्तीत जास्त तीन तासांपर्यंत असावा असा नियम आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

36 तासांपेक्षा अधिक काळ ओव्हर टाइम नाही

मात्र महिन्याभरामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याला 36 तासांपेक्षा अधिक काळ ओव्हर टाइम करायला लागू नये असंही नियमांमध्ये सांगितलेलं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

VIEW ALL

Read Next Story