डोसा बनवणे म्हणजे फारच किचकट काम असते. डोसा क्रिस्पी झाला नाही तर मुलंही खायला टाळाटाळ करतात
डोसा बनवताना बॅटर तव्यावर चिकटते आणि डोसाचा बेत फसतो
त्यामुळं डोसा क्रिस्पी आणि कुरकुरीत होण्यासाठी या टिप्स एकदा पाहाच
डोसा करण्याआधी तव्यावर पाण्याचा अजिबात वापर करु नका
तवा मंद आचेवर ठेवा त्यानंतर तव्यावर थोडेसे तेल टाकून तेल गरम झाल्यावर थोडे पाणी शिंपडून पुन्हा चांगले पुसून घ्या.
तव्यावर थोडे पाणी शिंपडून लगेचच तव्यावर डोसा काढायला घ्या.
तसंच, बॅटर टाकताना गॅस मंद आचेवर ठेवा जेणेकरून बॅटर तव्याला चिकटणार नाही