सध्याच्या काळात अनहेल्दी लाईफस्टाईल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे बऱ्याच जणांना हायबीपीची समस्या आहे.
हायबीपीची समस्या हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा धोकादायक असते.
एका आरोग्यदायी माणसाची बीपी 120/80 mmhg आहे.
हायबीपी लक्षणं : जेव्हा बीपी वाढतो तेव्हा डोकेदुखी, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे आणि हृदयाचे ठोके वाढणे अशी काही लक्षणे दिसून येतात.
धण्याचं पाणी हायबीपी नियंत्रित करण्यास मदत करू शकते.
धण्यामध्ये व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि मॅंगनीज आढळतात जे रक्तवाहिन्या निरोगी ठेवतात.
सेवन कसं करावं : एका ग्लास पाण्यात धणे पावडर मिसळा आणि रिकाम्या पोटी प्या.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)