झोप आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो.
झोप पूर्ण न होण्याची अनेक कारण आहेत आणि त्यापैकी हार्मोनची कमी देखील एक आहे.
हेल्थलाइन वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार, मेलाटोनिन असा एक हार्मोन आहे जो शरिराला बनवतो आणि झोप येण्यासाठी हा महत्त्वाचा आहे.
संध्याकाळ झाली की मेलाटोनिनचा लेव्हल ही आपोआप वाढू लागते. त्यामुळे त्यांना झोप येऊ लागते.
मेलाटोनिनची कमी असेल तर झोप येत नाही. त्याची देखील विशेष कारणं आहेत.
वाढतं वय, स्ट्रेस, लाइट पॉल्यूशन, काही औषधांची साइड इफेक्ट्स किंवा तुमची झोपण्याची एक वेळ फिक्स नसनं.
झोपण्या आधी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स कमी वापरा, रोज व्यायाम करा, झोपण्याआधी कॅफीन आणि मद्यपान करु नका, झोपण्याची एक योग्य वेळ ठरवा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)