डायबेटिज हा एक असा आजार आहे जो शरीराच्या विविध अंगांना प्रभावित करतो. डायबेटिजमुळे त्वचेवर इंफेक्शनचं प्रमाण वाढू शकतं.
डायबेटिज रुग्णांनी या इंफेक्शनकडे लक्ष द्यायला हवं. तसंच हे इंफेक्शन तोपर्यंत ठीक होत नाहीत जो पर्यंत डायबेटिज कंट्रोलमध्ये येत नाही.
डायबेटीजमुळे रक्तप्रवाह कमी होतो. ज्यामुळे पायांवरील संक्रमण वाढू शकतं.
डायबेटिज रुग्णांना मानेवर, चेहऱ्यावर फंगल इंफेक्शनचं प्रमाण वाढतं. डायबेटिजमुळे हातांवर सुद्धा फंगल इंफेक्शन होऊ शकतं.
वाढलेल्या डायबेटिजमुळे स्कॅल्पवर फंगल इंफेक्शन होऊ शकतं. यासह डोळ्याजवळ सुद्धा फंगल इंफेक्शन होऊ शकतं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)