आरोग्याच्या बाबतीत सजग राहत कायमच वैद्यकीय कारणांसाठीच्या आर्थिक गरजा भागवताना अनेकांची दमछाक होते.
मात्र कोणतीही आपात्कालीन परिस्थिती उदभवल्यास हीच आर्थिक गणितं सोपी करण्यास मदत होते ती म्हणजे मेडिक्लेमची.
मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स या दोन वेगवेगळ्या गोष्टी इन्शुरन्स मध्ये व्यक्तीला एक व्यापक सुरक्षा कवच मिळतं.
जिथं रुग्णालयात दाखल केल्यानंतरच्या खर्चांसह दाखल होण्याआधीचा, नंतरचा, डेकेअर, ओपीडी आणि रुग्णवाहिकेचा खर्च समाविष्ट असतो. पॉलिसीनुसार कंपनीकडून हा खर्च केला हातो.
उलटपक्षी मेडिक्लेम ही मूलभूत विमा पॉलिसी असून, रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच त्याची मदत मिळते. हा प्रकार इन्शुरन्सच्या तुलनेत कमी व्यापक आहे.
काही मेडिक्लेम पॉलिसीत रुग्णालयात दाखल होण्याची कमाल खर्च मर्यादा 5 लाखांपर्यंत असते. हेल्थ इन्शुरन्सच्या तुलनेत मेडिक्लेममध्ये कमी सुविधांचा वाव असतो.
मे़डिक्लेम कवर कमी असल्यानं ते हेल्थ इन्शुरन्सच्या तुलनेत स्वस्तात मिळते. मात्र Comprehensive Health Insurance निवडण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. हा विमा मोठ्या संकटात फायद्याचा ठरतो.