नीता अंबानी या त्यांच्या संपत्ती आणि लाइफस्टाइलबरोबरच सुंदर साड्यांसाठीही ओळखल्या जातात.
काही दिवसांपूर्वीच नीता अंबानी यांनी स्वत: एका दुकानामध्ये जाऊन साड्यांची खरेदी केली. हे दुकान नेमकं कोणतं तिथे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजकाची पत्नी शॉपींगला जाते पाहूयात...
नीता अंबानी यांनी काही दिवसांपूर्वी बंगळुरुमधील एका मोठ्या दुकानातून स्वत: साड्यांची खरेदी केली.
बंगळुरुमध्ये नीता अंबानींनी ज्या दुकानातून साड्या घेतल्या त्या दुकानाचं नाव आहे, 'द हाऊस ऑफ अंगडी'!
'द हाऊस ऑफ अंगडी' हे दुकान तेथील उत्तम कांजीवरम साड्यांसाठी प्रसिद्ध आहे.
'द हाऊस ऑफ अंगडी' मधूनच 2018 साली अभिनेत्री दीपिका पादुकोणने आपल्या लग्नाची साडी विकत घेतली होती.
दीपिकाने तिच्या रिसेप्शनमधील साडीही 'द हाऊस ऑफ अंगडी'मधून विकत घेतली होती.
'द हाऊस ऑफ अंगडी'चं बंगळुरु शहरामध्ये 18 हजार स्वेअर फूट एरिया असलेलं दुकान आहे.
'द हाऊस ऑफ अंगडी'ला 600 वर्षांची परंपरा असून अनेक पिढ्या याच व्यवसायात आहेत. सध्या या ब्रॅण्डचं नेतृत्व के. राधारमण करत आहेत.
'द हाऊस ऑफ अंगडी'मधील साड्यांची रेंज 25 हजारांपासून सुरु होते आणि अगदी 3 लाखांपर्यंत जाते.