या वर्षी भारतामध्ये मोठ्या संख्येनं लोकांना मलेरियाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. डास चावल्याने त्यांना मलेरिया झाला आहे.
मलेरिया हा जीवघेणा आजार असून दरवर्षी या आजारामुळे हजारो लोक मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे या आजाराला हलक्यात घेणं महागात पडू शकतं.
हात, पाय आणि सांधे दुखणे, डोळ्यांची बुबळं पिवळी पडणे आणि ताप येणे ही मलेरियाची सर्वसामान्य लक्षणं आहेत.
एनोफिलीज डासाच्या मादीने डंख मारल्यास मलेरियाची लागण होऊ शकते. त्यामुळे अधिक सावध राहणं फार महत्त्वाचं आहे.
छोट्याश्या आकाराचा डास हा प्राणघातक ठरु शकतो. खरं म्हणजे मलेरियाची लागण ज्या डासांमुळे होते ते मानवाचा चावा घेण्याची शक्यता जास्त असलेली दिवसातील एक ठराविक वेळ असते.
खरं तर मलेरियाचा संसर्ग करणारे डास के कधीही चावू शकतात. मात्र सूर्यास्तानंतर हे डास अधिक सक्रीय होतात, असं दिसून आलं आहे.
मलेरियाचा प्रादुर्भाव करणारे डास हे रात्री नऊ वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत सर्वाधिक सक्रीय असतात, असं दिसून येतं.
डासांपासून संरक्षण करण्यासाठी मच्छरदानीची जाळी, क्रिम, कॉल यासारख्या गोष्टींचा वापर रात्री झोपण्यापूर्वी करता येईल.
रात्री झोपताना आपल्या शरीराचा जास्तीत जास्त भाग झाकलेला राहील याची काळजी घेतल्यास डास चावण्याची शक्यता कमी होते.
Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून देण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.