कलिंगड काही लोक धुतात आणि कापून थेट फ्रीजमध्ये ठेवतात. असे केल्याने चवीवर परिणाम होतो हे अनेकांना माहीत नसते. याशिवाय कापलेले कलिंगड फ्रीजमध्ये ठेवणेही टाळावे.
कलिंगड रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची गरज नाही कारण त्याची साल खूप जाड असते, ज्यामुळे ते सहजपणे खराब होत नाही. तुम्ही वरच 15 ते 20 दिवस न कापता तसेच ठेवू शकता.
कलिंगड फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी ते 2 तास पाण्यात बुडवून ठेवावे, त्यानंतर ते ताजे कापून खावे. टरबूज थंड करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे. असे केल्याने त्यातील पोषक तत्वही संपत नाहीत.