उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आंबा हे फळ, अर्थात फळांचा हा राजा कमाल चर्चेत असतो.
काही मंडळी तर नाश्त्यात आंबा, जेवणात आंबा, लहानशा भुकेसाठीसुद्धा आंब्यावरच ताव मारतात.
उत्तम चवीसह या फळात विटामिन, फायबर आणि अटीऑक्सिडेंट अशी अनेक तत्त्वं असतात.
आंबा जीभेचे चोचले पुरवतो खरा, पण तो खात असताना त्याच्यासोबत नेमकं काय खायचं नसतं माहितीये?
असं म्हणतात की आंब्यासोबत दही खाऊ नये. दह्यामध्ये प्रोबायोटीक असल्या कारणानं आंब्यासोबत ते खाल्ल्यास पचनक्रियेत बिघाड होतो.
मसालेदार पदार्थांसोबतही आंबा खाऊ नये असा सल्ला दिला जातो. याशिवाय शीतपेय अर्थात कोल्डड्रींकसोबतही आंबा खाऊ नये असं म्हटलं जातं.
आंबट चवीच्या फळांसोबतही आंबा खाऊ नये. या दोन्ही पदार्थांमध्ये आम्लयुक्त घटकांचं प्रमाण जास्त असल्यानं त्याचा त्रास होऊ शकतो. (वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)