वेलचीला इंग्रजीत 'कार्डमम' म्हणतात. हिरव्या वेलचीला 'ग्रीन कार्डमम' आणि वेलदोड्याला 'ब्लॅक कार्डमम' म्हणतात.
बहुतेकदा पुलावमध्ये वापरल्या जाणाऱ्या जायपत्री किंवा जावित्रीला इंग्रजीत 'मेस' असं म्हणतात.
मराठीमध्ये ओळखलं जाणारं चक्रीफूल इंग्रजीत 'स्टार अनिस' या नावानं ओळखलं जातं.
जगातील सर्वात महागड्या मसाल्यांपैकी एक असणाऱ्या खसखसचं इंग्रजी नाव आहे 'पॉपी सिड्स'.
मेथीचे दाणेसुद्धा मसाल्याचा भाग असून, त्यांना 'फेन्युग्रीक' असं संबोधलं जातं.
तमालपत्राला इंग्रजीत 'बे लिफ' असं म्हणतात. जेवणात त्याची चव लगेचच ओळखू येते.
हिंगाला इंग्रजीत 'अॅसाफटिडा' असं म्हणतात. पचनक्रीया सुरळीत ठेवण्यासाठीही हिंग जेवणात वापरतता.