महाशिवरात्रीच्या उपवासात 'हे' 5 पदार्थ ठेवतील एनर्जेटिक

Feb 26,2025


आज म्हणजेच 26 जानेवारी रोजी सर्वत्र महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यादिवशी लोक उपवास करतात.


तुमचा देखील महाशिवरात्रीचा उपवास असेल तर, तर दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा नक्की समावेश करु शकता.

बटाट्याचे सेवन

महाशिवरात्रीच्या उपवासात स्वत:ला एनर्जेटिक ठेवण्यासाठी यादिवशी तुम्ही बटाट्याचे सेवन करु शकता.

कुट्टूच्या पूऱ्या

यादिवशी उपवासाच्या आहारात तुम्ही कुट्टू म्हणजेच बकव्हीटच्या पूऱ्यासुद्धा खाऊ शकता. आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर मानले जाते.

मखाण्याचे लाडू

महाशिवरात्रीच्या उपवासात तुम्ही मखाण्याच्या लाडूंचे सेवन करु शकता. यामुळे ताकद मिळण्यास मदत होते.

शिंगाड्याचा हलवा

उपवासाच्या दिवशी तुम्ही शिंगाड्याचा हलवा बनवून देखील त्याचे सेवन करु शकता. हे चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठी लाभदायक मानलं जातं.

लस्सी

यादिवशी तुम्हाला काही जड पदार्थ खायचा नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही लस्सीचे देखील सेवन करु शकता.

VIEW ALL

Read Next Story