कंटेनर कितीही चांगल्या क्वालिटीच्या प्लास्टिकने बनलेले असोत ते खाणं स्टोर करण्यासाठी आणि खाण्यासाठी सुरक्षित मानले जात नाहीत.
गरम पदार्थ, प्लास्टिकच्या डब्यात ठेऊ नये. कारण यातील हिट प्लास्टिकमध्ये असणाऱ्या केमिकल जसे BPA फथलेटस् खाण्यात खाण्यात मिसळतात. जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.
प्लास्टिकच्या डब्यांमध्ये कच्चे मांस ठेवणं टाळावं. यामध्ये आधीच बॅक्टेरिया असतात, जे प्लास्टिकच्या डब्यांमध्ये आणखी वाढू शकतात. प्लास्टिकमधील रसायने मांसातही जाऊ शकतात.
टोमॅटो, संत्री आणि बेरी यांसारखी फळे देखील प्लास्टिकच्या डब्यात ठेवू नयेत. प्लास्टिकमधील रसायने फळांच्या चवीला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे ही फळं काचेच्या डब्यात साठवणे चांगलं ठरेल.
लोणच्या सारखे आंबवलेले पदार्थ प्लास्टिकच्या डब्यात साठवू नका. आंबवलेल्या पदार्थांच्या संपर्कात आल्यास प्लास्टिक बीपीए आणि फॅथलेट्स सारखी रसायने बाहेर टाकू शकते, जी अन्नात जाऊ शकते. परिणामी आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
चीज, बटर आणि नट्स सारखे चरबीयुक्त पदार्थ देखील प्लास्टिकच्या डब्यात ठेवू नयेत. हे पदार्थ प्लास्टिकमधील रसायनांच्या संपर्कात येऊ शकतात आणि शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात.
वस्तू प्लास्टिकच्या डब्यात ठेवण्याऐवजी तुम्ही काचेचे किंवा स्टीलचे डबे वापरू शकता. प्लास्टिकपेक्षा हा एक सुरक्षित पर्याय आहे.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)