भारतात सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी नाही. आपल्यापैकी अनेकजण आयुष्यात एकदा तरी सोन्याचा दागिना खरेदी करण्यासाठी जातो.
सोने खरेदीसाठी ठराविक मुहुर्तांप्रमाणे काही वारही ठरलेले असतात.
सोन्याची खरेदी करण्यासाठी शुक्रवार हा सर्वात शुभ मानला जातो.
त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल, तर शुक्रवारचा दिवस निवडा.
शुक्रवार हा दिवस लक्ष्मीचा मानला जातो.
पण चुकूनही शनिवारी सोन्याची दागिन्यांची खरेदी करु नका.
सोनं हे सूर्यदेवाचे प्रतिक मानले जाते. सूर्य आणि शनी यांचे पिता-पुत्राचे नाते आहे.
त्या दोघांमध्ये शत्रूत्व आहे. त्यामुळेच शनिवारी सोने खरेदी शुभ मानलं जात नाही.
शनिवारी सोने खरेदी केल्याने आर्थिक स्थितीवर प्रभाव पडतो. त्याबरोबरच शनीदेवही रागवतो.