आपल्यापैकी बर्याच लोकांना सकाळी उठल्यावर चहा-कॉफी घेण्याची सवय असते. प्रत्येक चहामध्ये किमान 2-3 तासांचे अंतर असणं आवश्यक आहे. पण चहासोबत काही पदार्थ खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.
चहा पिण्यापूर्वी किंवा त्यानंतर दही आणि दह्याचे पदार्थ खाऊ नका. अन्यथा पचनाच्या समस्या निर्माण होतात.
तुम्हाला सकाळी नाश्त्यात फळं खाण्याची सवय असेल तर चहा पिताना किंवा प्यायल्यानंतर लगेच खाऊ नका. चहा पिणे आणि फळे खाणे यामध्ये किमान एक तासाचे अंतर असावे.
चहा पिण्यापूर्वी किंवा लगेचच कोणताही रस पिऊ नका. यामुळे गॅस निर्माण होतो.
चहा पिताना हळद किंवा हळदयुक्त पदार्थ अजिबात घेऊ नका. यामुळे पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतात.
चहासोबत कधीही कच्चे पदार्थ म्हणजे उकडलेली अंडी आणि मोड आलेले कडधान्य खाऊ नये. यामुळे शरीराला उपाय होऊ शकतो.
चहा प्यायल्यावर लगेच गार पाणी पिऊ नये.
चहासोबत शेव, फरसाण खाणे टाळावे. यामुळे पचनसंस्थेशी निगडीत समस्या निर्माण होतात.