शरीरात होणारे बदल, तसेच अनेक आजारांचे होणारे संकेत तुमच्या जिभेवर दिसू लागतात.
जिभेचा रंग, आकार, सांगतो की तुम्हाला कोणता आजार आहे किंवा तुमच्या शरीरात कोणत्या पोषकतत्वांची कमतरता आहे.
जर तुमच्या जिभेचा रंग लाल होत असेल तर हे व्हायरल इन्फेक्शन, ताप किंवा व्हिटॅमिन बी ची कमतरता दर्शवतं.
जिभेचा रंग हा फिकट असेल तर हे एनिमिया किंवा रक्ताच्या कमतरतेचं लक्षण आहे.
निळ्या किंवा हलक्या वांगी रंगाच्या जिभेचा अर्थ रक्तप्रवाहाची कमतरता, फुफुसांची समस्या असू शकतं.
तर जिभेवर पिवळ्या रंगाचा थर येणं हे पचनक्रिया किंवा लिव्हरशी निगडित समस्येचं लक्षण असू शकतं.
जिभेवरची पांढरी कोटिंग ही शरीरातील पाण्याची कमतरता दर्शवतं.
जीभवर सूज दिसत असेल तर हे इन्फेक्शन, एलर्जी किंवा हार्मोनल समस्येचं लक्षण आहे.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांशी संपर्क साधावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)