वाढतं वजन नियंत्रणात आणण्यासाठी रात्री 'या' 5 सवयी लावूनच घ्या!

Mansi kshirsagar
May 09,2025


तुमचं वजन वेगाने वाढत असेल तर तु्महीदेखील या काही सवयींमुळं वजन नियंत्रणात आणू शकता


त्यामुळं रात्रीच्या डिनरनंतर काही सवयींमध्ये सुधारणा करुन वजन कमी करण्यास मदत मिळू शकते


रात्री कोणत्या सवयींमुळं तुम्ही वजन नियंत्रणात आणू शकता, हे जाणून घेऊया


रात्री जेवल्यानंतर थोडावेळ वॉक करा. तुम्ही 10 ते 15 मिनिटे शतपावली करुन शकता. यामुळं जेवण चांगले पचते


जेवण जेवल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. जेवणाच्या आधी 1-2 ग्लास पाणी प्या. यामुळं मेटाबॉल्जिम चांगले राहते आणि वेट लॉससाठी फायदेशीर ठरते


रात्री जेवण झाल्यानंतर दीर्घ श्वास घ्या. त्यामुळं ताण कमी होतो. स्ट्रेस लेव्हल वाढल्यामुळं कोर्टिसोल, एड्रेनालाईन आणि नॉरपेनेफ्रिनसारखे हार्मोन रिलीज होतात. ज्यामुळं वजन वाढू शकते.


रात्री शक्यतो मोबाईलचा अतिवापर टाळा. त्यामुळं तुम्ही दीर्घवेळ एकाच ठिकाणी बसून असता.


डिनरनंतर शरीर ताणमुक्त व रिलॅक्स ठेवण्यासाठी थोडीशी स्ट्रेचिंग करा. ज्यामुळं वजन कमी करण्यास मदत मिळते


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story