मनात साचलेल्या अनावश्यक विचारांना असं आवरा; शांततेसाठी 5 टिप्स
बदलत्या जगात अनेकदा लोक नकारात्मक विचारांनी ग्रासलेले असतात आणि ही अगदीच सामान्य बाब आहे.
परंतु सतत मनामध्ये अनावश्यक गोष्टींचा विचार येणं, कित्येकदा गंभीर आजारांना आमंत्रण देतं.
जर तुम्ही सुद्धा अशा समस्येचा सामना करत असाल तर काही टिप्सचा वापर करुन तुम्ही ही समस्या दूर करु शकता. पाहुयात अशाच काही टिप्स
मनाच्या शांततेसाठी आणि डोक्यात चालणाऱ्या निरर्थक विचारांपासून सुटका मिळवण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजेच 'मेडिटेशन'.
दररोज 5 मिनिटे ध्यान लावून बसल्याने मन अगदी शांत होते आणि मनाची एकाग्रता वाढते.
अशात स्वत: ला व्यस्थ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. स्वत: ला कामात गुंतवून ठेवल्याने डोक्यात निरर्थक विचार येत नाहीत.
तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी वेळोवेळी करत रहा. यात तुम्ही पुस्तके वाचू शकता, आवडीची चित्रे काढू शकता ज्यामुळे तुम्ही नकारात्मक विचारांना आळा घालू शकता.
आपल्या प्रकृतीकडे लक्ष देत जीवनाचा आनंद घ्या तसेच हव्या त्या ठिकाणी जाऊन आपला मित्र परिवार आणि कुटूंबीयांसोबत वेळ घालवा.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)