गाढव कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? नाव ऐकून वाटेल आश्चर्य

Pooja Pawar
Apr 07,2025


गाढव हा पाळीव प्राणी असल्याने भारतासह अनेक देशात तो विविध कामांसाठी पाळला जातो.


खासकरून भारतात गाढवाचा उपयोग हा वजनदार ओझी उचलून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी केला जातो. परंतु गाढवाला विशेष महत्व दिले जात नाही.


परंतु एक असा देश आहे ज्याचा राष्ट्रीय प्राणी 'गाढव' हा आहे.


गाढव हा कॅटलोनिया (स्पेन) या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. गाढवाला या आदेशात मेहनत आणि धैर्याचं प्रतीक मानलं जातं.


कॅटलोनिया जातीचा हा गाढव जगातील सर्वात दुर्लभ आणि मजबूत गाढवांपैकी एक आहे.


स्पेनचे राष्ट्रीय प्राणी म्हणून जिथे बैलाची निवड केली, तिथे कॅटलोनियाने गाढवाची राष्ट्रीय प्राणी म्हणून निवड केली आहे.


हा गाढव कॅटलोनियाच्या स्वतंत्रता आणि राष्ट्रवादाचा प्रतीक आहे. लुप्त होणाऱ्या या विशेष जातीच्या गाढवांच्या रक्षणासाठी विविध प्रयत्न करण्यात आले आहेत.

VIEW ALL

Read Next Story