तुम्ही दररोज मोबाईल आणि लॅपटॉपला वायफाय कनेक्ट करून वापरत असाल. पण तुम्हाला याचा फुलफॉर्म माहितीये का?
जर तुम्हालाही WiFi चेफुलफॉर्म माहित नसेल, तर याविषयी तुम्हाला सांगणार आहोत.
WiFi चा फुलफॉर्म Wireless Fidelity हा आहे.
WiFi एक वायरलेस नेटवर्किंग तंत्रज्ञान असून रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे वायरलेस हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करते.
अनधिकृत वापरकर्त्यांना तुमच्या वाय-फायचा गैरवापर करण्यापासून रोखण्यासाठी एक मजबूत पासवर्ड तयार करा.
अनेकांचा फोन ड्युअल-बँड वाय-फायला सपोर्ट करतो, म्हणजेच फोन 2.4GHz आणि 5GHz दोन्हीशी कनेक्ट होऊ शकतो.
5GHz वर 2.4GHz पेक्षा वेगवान इंटरनेट देते, म्हणून उच्च गतीसाठी 5GHz वापरणे चांगले.