सोशल मीडियावर व्हायरल आहे की पाणी काही वेळ सूर्यप्रकाशात ठेवून ते पिल्यास शरीराला व्हिटॅमिन-D मिळते.
व्हिटॅमिन-D हे अन्नातून थोड्या प्रमाणात मिळते, परंतु त्याचा मुख्य स्रोत सूर्यप्रकाश आहे.
जेव्हा त्वचेवर सूर्याच्या UVB किरणांचा संपर्क येतो, तेव्हा त्वचेतील कोलेस्टेरॉलपासून व्हिटॅमिन-D तयार होते. म्हणजेच ही प्रक्रिया थेट त्वचेत होते पाण्यात नाही.
पाणी सूर्यप्रकाशात ठेवल्याने त्यात व्हिटॅमिन-D तयार होत नाही.
पाण्यात व्हिटॅमिन-D निर्माण करणारी जैविक प्रक्रिया होत नाही. UVB किरणांचा परिणाम त्वचेवर होतो, पाण्यावर नाही.
पाणी फक्त तापते, त्याच्या पौष्टिक घटकांमध्ये असा बदल होत नाही की त्यातून व्हिटॅमिन-D निर्माण होईल.
उन्हात ठेवलेले पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक नसले, तरी त्यातून व्हिटॅमिन-D मिळते असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.