पावसाळ्यात केस आणि त्वचा खराब होऊ लागते. ओलावा, धूळ आणि पावसातील दूषित पाणी यामुळे केसांना दुर्गंधी येऊ लागते.
अनेकदा पावसात भिजल्यावर केसांना येणाऱ्या या वासामुळे त्रास होतो. मात्र, काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही हा वास दूर करून केस पुन्हा मऊ, सुगंधी आणि निरोगी बनवू शकता.
दही आणि पुदिन्याची पानं मिसळून केसांना लावा. 15-20 मिनिटांनी धुवून टाका. हा पॅक दुर्गंधी दूर करून केसांना थंडावा आणि मऊपणा देतो.
दहीमध्ये चिमूटभर दालचिनी मिसळून केसांच्या मुळांवर लावा. 20 मिनिटांनी धुवून टाका. हे मिश्रण केसांच्या दुर्गंधीबरोबर कोंड्याची समस्या देखील कमी करतं.
एका मगात पाणी घेऊन त्यात दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि केस धुतल्यावर शेवटी या मिश्रणाने रिन्स करा. हे केसांना चमकदार बनवून वास घालवतो.
ताज्या कोरफडीचा गर केसांच्या मुळांवर लावा. 20 मिनिटांनी सौम्य शॅम्पूने धुवा. हा नैसर्गिक कंडिशनर केसांना ओलावा देऊन ताजेपणा देतो.
शॅम्पूनंतर पाण्यात लिंबाचा रस मिसळून केस धुतल्याने दुर्गंधी निघून जाते आणि केसांना नैसर्गिक चमक मिळते.
रात्रभर भिजवलेले मेथी दाणे वाटून गुलाबपाण्यात मिसळा आणि केसांवर लावा. हे केसांना थंडावा देऊन वास नष्ट करतात.
नारळाच्या तेलात 2-3 थेंब टी-ट्री ऑईल मिसळून केसांना लावा. हे अँटिबॅक्टेरियल असल्याने केसांचा वास आणि स्कॅल्पचे इन्फेक्शन कमी करते.