नारळाची साले कचऱ्यात फेकताय? आधी जाणून घ्या 5 अनोखे फायदे!

Published by: Intern | Apr 05, 2025

नारळाचा वापर प्रामुख्याने पूजेसाठी किंवा स्वयंपाक घरात केला जातो.

Published by: Intern | Apr 05, 2025

नारळ फोडताना त्यावरील साले आपण अनेकदा फेकून देतो. मात्र, या नारळाच्या सालींचा उपयोग अनेक घरगुती आणि नैसर्गिक कामांसाठी करता येतो.

Published by: Intern | Apr 05, 2025

या सालांमध्ये असणारे घटक विविध प्रकारे उपयोगात आणता येतात.

Published by: Intern | Apr 05, 2025

जाणून घेऊयात नारळाच्या सालींचा वापर नेमका कुठे-कुठे करता येतो.

Published by: Intern | Apr 05, 2025

1. केसांच्या वाढीसाठी नैसर्गिक उपाय

नारळाच्या सालांना मिक्सरमध्ये बारीक करून ते नारळाच्या तेलात मिसळा. हे मिश्रण केसांना लावल्यास केसांची वाढ सुधारते आणि केस अधिक मजबूत होतात.

Published by: Intern | Apr 05, 2025

2. दातांवरील पिवळेपणा कमी करण्यासाठी

नारळाच्या सालांना थोडं वाळवून त्याचा चुरा तयार करा आणि दातांवर सौम्यपणे घासा. यामुळे दात स्वच्छ आणि चमकदार होतात. हि एक घरगुती नैसर्गिक टूथपावडर म्हणून वापरता येते.

Published by: Intern | Apr 05, 2025

3. जैविक खत म्हणून वापर

या सालांचा चुरा झाडांच्या मुळांजवळ टाकल्यास तो नैसर्गिक खतासारखा काम करतो. जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि झाडांची वाढ चांगली होण्यासाठी या साली उपयुक्त ठरतात.

Published by: Intern | Apr 05, 2025

4. भांडी घासण्यासाठी उपयुक्त

नारळाच्या सालांचा वापर भांडी स्वच्छ करण्यात करता येतो. विशेष म्हणजे कढई किंवा लोखंडी भांड्यांवरील चिकटलेले अन्न हटवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

Published by: Intern | Apr 05, 2025

5. चुल किंवा कॅम्प फायर पेटवण्यासाठी

नारळाच्या कोरड्या साली अतिशय ज्वलनशील असतात. त्यामुळे त्यांचा वापर चुल किंवा कॅम्पफायर पेटवण्यासाठी सहज करता येतो.

Published by: Intern | Apr 05, 2025

नारळाची साले साठवताना त्या कोरड्या जागी वाळवून ठेवा. जेणेकरून त्यांचा दीर्घकाळ उपयोग करता येईल.

Published by: Intern | Apr 05, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Intern | Apr 05, 2025

VIEW ALL

Read Next Story