लग्न समारंभ असो किंवा न्यू ईयर पार्टी प्रत्येकाला यासाठी सुंदर दिसायचं आहे. पण पोटाची चरबी वाढल्यामुळे तुम्ही चिंतेत आहात.
मग आजपासून रोज महिनाभर सकाळी उठल्यावर खालील पाणी प्यायल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी लिंबू आणि मध पाणी हा सर्वात सोपा आणि प्राचीन उपाय आहे. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या. त्यात एक चमचा मध घाला.
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात.
मेथीच्या दाण्यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात.
एक चमचा मेथी दाणे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. हे पाणी सकाळी गाळून रिकाम्या पोटी प्या.
पोटाची चरबी झपाट्याने कमी करण्यासाठी जिरे पाणी उपयुक्त आहे.
एका ग्लास पाण्यात एक चमचा जिरे घालून रात्रभर भिजत ठेवा. हे पाणी सकाळी उकळून गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर प्या.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)