शेवग्याच्या शेंगा या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात.
ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते अशा लोकांनी शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते.
शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास पचनशक्ती सुधारते व बद्धकोष्ठता आणि गॅस असे आजार दूर होतात.
शेवग्याच्या शेंगा या रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तसेच रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात.
शेवग्याच्या शेंगा या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास आणि मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
शेवग्याच्या शेंगामुळे त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या कमी होतात व त्वचेला पोषण देतात.
शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्यामुळे ते हाडांना मजबत करण्यास मदत करतात.
जर एखाद्या व्यक्तीचे केस गळत असतील तर त्या व्यक्तीने शेवग्याची शेंग खाल्ल्यास केस गळणे कमी होते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)