बऱ्याचदा घरामध्ये डास आणि माशा उच्छाद मांडतात. विविध प्रयत्न करूनही डास घरातून जाण्याचं नाव घेत नाहीत.
डास चावल्याने माणसांना डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होऊ शकतात.
तेव्हा काही अशा घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊयात जेणेकरून डास आणि माशा दूर होतील.
डासांपासून सुटका मिळवायची असेल तर तुरटी आणि लिंबूचा रस तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो.
लिंबाचा रस आणि तुरटीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात ज्यामुळे डासांना दूर पळवण्यास मदत होते.
लादी पुसताना कोमट पाणी घ्या आणि त्या पाण्यात लिंबाचा रस आणि तुरटीची पावडर मिक्स करा.
दररोज पाण्यात लिंबूचा रस आणि तुरटीची पावडर मिक्स करून याने लादी पुसल्यावर घरातून डास गायब होतील.