सतत लघवीला लागणे, पाय सुन्न पडणे अन्... ही 10 लक्षणं दिसल्यास Diabetes आहे असं समजावं

Published by: Swapnil Ghangale | Jan 16, 2024

झपाट्याने रुग्णवाढ

मधुमेह म्हणजेच डायबेटीजच्या रुग्णांची संख्या जगभरात झपाट्याने वाढत आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 16, 2024

मेटाबायोटीक आजार

मधुमेह हे एक मेटाबायोटीक आजार आहे. यामध्ये इन्शुलिनची पुरेश्याप्रमाणात निर्मिती होत नाही.

Published by: Swapnil Ghangale | Jan 16, 2024

हृदय, किडनी आणि डोळ्यांवर परिणाम

इन्शुलिनच्या कमतरतेमुळे रक्तामधील साखरेचं प्रमाण वाढतं. त्याचा परिणाम हृदय, किडनी आणि डोळ्यांवर परिणाम होतो.

Published by: Swapnil Ghangale | Jan 16, 2024

समस्या आहे हेच समजत नाही

ज्यांना टाइप-2 डायबेटीज असतो त्यांना आपल्याला ही समस्या आहे हे समजण्यासाठीच फार वेळ जातो.

Published by: Swapnil Ghangale | Jan 16, 2024

10 लक्षणांबद्दल जाणून घेऊ

म्हणूनच आपण अशा 10 लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या माध्यमातून टाइप-2 डायबेटीज असल्याचं स्पष्ट होतं...

Published by: Swapnil Ghangale | Jan 16, 2024

तहान लागणे

सतत तहान लागणे हे डायबेटीजचं पहिलं सर्व सामान्य लक्षणं आहे. अशा स्थितीत वारंवार तोंड कोरडं पडतं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 16, 2024

जास्त भूक लागणे आणि...

अचानक जास्त भूक लागणे आणि गोड खाण्याची इच्छा होणे हे सुद्धा डायबेटीजचं लक्षण आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 16, 2024

अधिक खाण्याची गरज असल्याचे संकेत

तुमच्या शरीरामधील साखरेचं प्रमाण कमी होतं तेव्हा तुमचं शरीर तुम्हाला अधिक खाण्याची गरज आहे असे संकेत देते.

Published by: Swapnil Ghangale | Jan 16, 2024

भरपूर खाऊन कमी वजन

तुम्ही भरपूर खाता मात्र तुमचं वजन कमी होत असेल तर हे डायबेटीजचे लक्षण आहे असं समजावं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 16, 2024

वारंवार लघवी

वारंवार तुम्हाला लघवीला जावे लागत असेल तर ही समस्या डायबेटीजकडे लक्ष वेधते.

Published by: Swapnil Ghangale | Jan 16, 2024

मूड स्वींग

कोणतेही कारण नसताना मूड स्वींग होणे हे सुद्धा डायबेटीज असल्याचं लक्षण आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 16, 2024

वारंवार झोप लागणे

डायबेटीजची समस्या असलेल्यांना वारंवार झोप लागणे आणि निद्रावस्थेत असण्याची समस्याही भेडसावते.

Published by: Swapnil Ghangale | Jan 16, 2024

डायबेटीजकडे इशारा

पाय सुन्न पडणं आणि वेदना होणे यासारख्या गोष्टीही डायबेटीजकडे इशारा करतात.

Published by: Swapnil Ghangale | Jan 16, 2024

...तर तातडीने डॉक्टरांना भेटा

तुम्हाला जखम झाली असेल आणि ती लगेच भरुन निघत नसेल तर तातडीने डॉक्टरांना भेटा. हे डायबेटीजचं लक्षण आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 16, 2024

थकवा, धूसर दिसणे अन्...

तुम्हाला फार थकवा जाणवत असेल किंवा धूसर दिसत असेल अथवा रक्तदाब वाढला असेल तर ही सुद्धा डायबेटीजची लक्षणं आहेत असं समजावं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 16, 2024

VIEW ALL

Read Next Story