बारावी पास विद्यार्थ्यांसाठी घरबसल्या कमाई करण्याचे 7 सोपे मार्ग; एकदा ट्राय करुन तर पाहा

Swapnil Ghangale
May 29,2024

फ्रीलान्सर म्हणून काम करा

तुम्हाला लिखाणाची आवड किंवा ग्राफिक डिझानमधील ज्ञान असेल तर तुम्ही चांगली कमाई फ्रीलान्सींगच्या माध्यमातून करु शकता. कोडिंगमध्येही तुम्ही फ्रिलान्सींग करु शकता.

घर बसल्या काम मिळवा

अपवर्क, फिव्हर यासारख्या वेबसाईटवर तुम्हाला घर बसल्या लिहिण्याचं, ग्राफिक डिझानचं अन् इतरही कामं मिळू शकतात.

कंटेट क्रिएटर व्हा

दिवसभर इन्स्टाग्रामवर रिल्स पाहण्याऐवजी रिल्स बनवणाऱ्यांपैकी एक व्हा! तुम्ही कंटेट क्रिएशनच्या माध्यमातूनही कमाई करु शकता.

सोशल मीडियावरुन पैसा कमवू शकता

इन्स्टाग्रामबरोबरच युट्यूब, ब्लॉग्समधून मॉनेटायझेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रेक्षकांबरोबरच जाहिरातीमधून पैसा कमवू शकता.

सर्वेक्षणात सहभागी व्हा

ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये सहभागी होऊन घर बसल्या झटपट पैसा कमवता येईल. वेगवेगळ्या विषयांवर तुम्हाला काय वाटतं याची मतं या सर्वेक्षणात नोंदवावी लागतात.

इतरांना ज्ञान वाटा

तुमच्याकडे असणाऱ्या ज्ञान इतरांना वाटा. म्हणजेच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना लेक्चर्स देऊ शकता. हा पैसे कमवण्याचा उत्तम मार्ग आहे.

वेगवेगळ्या वस्तू तयार करायची आवड असेल तर...

तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू तयार करायला आवडतं का? मग तुम्ही बऱ्याच ऑनलाइन वेबसाईटवर तुमच्या या वस्तू विकून सहज पैसे कमवू शकता. तुमच्या छंदातूनच तुम्हाला कमाईचा मार्ग सापडेल.

घर बसल्या इंटर्नशीप

घर बसल्या इंटर्नशीप करण्याची संधी देणाऱ्याही अनेक कंपन्या आहेत. जगभरातील वेगवेगळ्या कंपन्या अशी संधी देतात, फक्त तुम्हाला त्याचा शोध घेता आला पाहिजे.

सेल्स पर्सन म्हणून काम करता येईल

कमिशन बेस सेल्स पर्सन म्हणून तुम्ही काम करु शकता. तुमच्या कौशल्यानुसार तुम्हाला यातून कमाई करता येईल.

घराबाहेर पडायची इच्छा असेल तर..

आधीचे सात पर्याय वगळून घराबाहेर पडायचं असेल तर स्थानिक कॉफी शॉप, दुकाने, डेटा एन्ट्री तसेच हॉटेलमध्ये तुम्ही पार्ट टाइम जॉब करुन पैसे कमवू शकता. यामध्ये सातत्यपूर्ण कमाई करता येईल.

घराबाहेर पडून या कामांचाही करता येईल विचार

हाऊस सिटींग, डॉग वॉकिंग किंवा बेबी सिटींगसारख्या गोष्टींमधूनही तुम्ही पैसे कमवू शकता. कमी काळ काम करुन यात अधिक पैसा मिळेल.

सावध राहा

वरील यादी ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. तुम्ही योग्य वेबसाईट आणि योग्य रेफ्रन्सनेच अशी कामं केल्यास अधिक धोका नसतो. तसेच अशावेळेस खोटी आश्वासनं देणाऱ्या स्पॅम कॉलपासून सावध राहा.

VIEW ALL

Read Next Story