लिव्हिंग रुमची शोभा वाढवण्यासाठी सोफे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मात्र घरातील लेदरचे सोफे स्वच्छ करणे हे अनेकांना अवघड काम वाटते.
तुमच्या घरीसुद्धा लेदरचे सोफे असतील, तर ते स्वच्छ करण्यासाठी 'या' टीप्स नक्की ट्राय करा.
जर सोफ्यावरील जमलेली धुळ जात नसेल तर अशावेळी तुम्ही व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करु शकता.
कोणतंही सुती किंवा कॉटनचं कापड हलकं ओलं करुन तुम्ही सोफा स्वच्छ करु शकता.
याव्यतिरिक्त, बाजारात मिळणारे लेदर क्लिनरदेखील सोफा स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरतील. यामुळे सहजरित्या लेदरचे सोफे स्वच्छ होण्यास मदत होईल.
यासोबतच, सोफा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लेदर कंडिशनरचा वापरदेखील करु शकता.
सोफ्यातून धुळ काढून टाकण्यासाठी तुम्ही एखाद्या सॉफ्ट ब्रशचा वापर करु शकता.
वारंवार सोफा स्वच्छ करायला हवा जेणेकरुन सोफ्यावर जास्त धुळ जमा होणार नाही.