पावसाळ्यातील दमट हवामानामुळं अनेक पदार्थांना बुरशी लागते किंवा दमट होतात.
अनेकदा बरणीत ठेवलेल्या मीठालादेखील पाणी सुटते. त्यामुळं मीठ वापरणे शक्य होत नाही
त्यामुळं आज आम्ही तुम्हाला या काही टिप्स सांगणार आहोत
मीठाच्या डब्यात लवंग ठेवल्याने त्यातील दमटपणा कमी होतो आणि दीर्घकाळापर्यंत फ्रेश राहते
तांदळाचे दाणे कापडात बांधून तो मीठाच्या डब्यात ठेवून दिल्यास मीठाला पाणी सुटणार नाही
राजमादेखील पाणी शोषून घेते. राजमाचे काही दाणे मीठाच्या बरणीत टाका त्यामुळं मीठ खराब होत नाही
मीठाचा डब्बा सिंक किंवा गॅसजवळ ठेवू नका. मीठ एका एअरटाइट डब्यात ठेवू शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)