काही भाज्या आपण सोलून खातो, पण त्यांच्या सालीतच भरपूर पोषक तत्त्वे असतात. त्यामुळे काही भाज्या सालीसकट खाल्ल्यास शरीराला जास्त फायदे मिळतात.
बटाट्याच्या सालीत पोटॅशियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. शिजवताना सालीसकट वापरल्यास पचन सुधारते व वजन नियंत्रित राहते.
गाजराच्या सालीत बीटा-कॅरोटीन मुबलक असते. हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून त्वचेसाठीही चांगले आहे.
बीट सालीसकट खाल्ल्यास त्यातील लोह आणि फायबर अधिक प्रमाणात मिळते. त्यामुळे रक्तवाढीस मदत होते.
वांग्याच्या सालीत नॅसुनिन नावाचं अँटिऑक्सिडंट असतं जे मेंदूच्या पेशींचं संरक्षण करतं.
काकडीच्या सालीत सिलिका आणि फायबर भरपूर असते. हे केस, त्वचा आणि नखांसाठी फायदेशीर आहे.
दुधीच्या सालीत अँटिऑक्सिडंट्स असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.