हिवाळ्याचे आगमन होताच गृहिणी आवर्जून मेथीचे पराठे जेवणात बनवतातच. या ऋतूत मेथीपासून अनेक गोष्टी बनवल्या जातात.

Nov 16,2023


पोषक तत्वांनी भरपूर असल्याने मेथी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. याच्या सेवनाने अनेक प्रकारचे आजार दूर होतात.


असं असलं तरी, मेथीचं अतिसेवन हानिकारक देखील असू शकतं. चला जाणून घेऊया मेथी शरीराला कशाप्रकारे हानी पोहोचवू शकते...


मेथी ही पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी रामबाण उपाय म्हणून काम करते. पण मेथीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोट खराब होऊ शकते.


मेथी शरीरातील शुगर लेवल कमी करण्यासाठी देखील ओळखली जाते.पण ती जास्त प्रमाणात कमी झाल्यानेही आरोग्य बिघडू शकते.


मेथी केवळ शुगरच्याच नाही तर रक्तदाबाच्या रुग्णांसाठीही हानिकारक ठरू शकते. मेथीच्या पानांमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते. जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील सोडियमची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे बीपी वाढू शकतो.


मेथीच्या अतिसेवनाने श्वसनाच्या समस्या वाढू शकतात. खरं तर, मेथीच्या उष्ण स्वभावामुळे, त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म फुफ्फुसांसाठी धोकादायक ठरू शकतात.


मेथीच्या उष्ण स्वरूपामुळे, गर्भवती महिलांना त्याचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. मेथीचे जास्त सेवन केल्याने रक्त गोठण्याचे काम मंद होण्याचा धोका असतो. यामुळे गरोदरपणात पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे पोट खराब होऊ शकते.


मेथीचे जास्त सेवन केल्याने लघवीला दुर्गंधी येऊ शकते. अशा परिस्थितीत मेथीचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. जास्त प्रमाणात मेथी खाणे धोकादायक ठरू शकते.

VIEW ALL

Read Next Story