रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते आणि शरीरातल्या ॲसिडची पातळी बिघडू शकते, ज्यामुळे तुम्हाला गॅस आणि थकवा येऊ शकतो.
द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवू शकते आणि त्यामुळे चक्कर येणे किंवा डोकेदुखी सारख्या समस्या होऊ शकतात.
संत्र्यामध्ये ॲसिड मोठ्या प्रमाणात असते. रिकाम्या पोटी संत्रे खाल्ल्याने पोटात जळजळ, गॅस आणि ॲसिडीटीच्या समस्या होऊ शकतात. यामुळे रिकाम्या पोटी संत्रे खाणे टाळावे.
सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात विरघळणारे फायबर असतात, परंतू रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यास आतड्यांसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात आणि गॅसची समस्या वाढू शकते.
अननसात ब्रोमेलेन नावाचे एंजाइम असते, जे रिकाम्या पोटी खाल्ल्याने ॲसिडीटीची समस्या निर्माण होऊ शकते.
पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. रिकाम्या पोटी ते खाल्ल्याने पोटात गॅस आणि ब्लोटिंग होऊ शकते. पेरूचे सेवन जेवल्यानंतरच करणे योग्य असते.
काकडीमध्ये भरपूर पाणी असते, पण काकडी रिकाम्या पोटी खाल्ल्याने पोट जड होऊ शकते आणि उलट्या होऊ शकतात. यासाठी रिकाम्या पोटी काकडी खाणे टाळावे.
(इथं दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)