आजकाल फक्त चवीसाठी किंवा ट्रेंड म्हणून लोकं कित्येक पदार्थ कच्चे खातात.
हे पदार्थ काहीजण सॅलाड म्हणून तर काही पदार्थांवर गार्निश करून खतात.
काही असे पदार्थ आहेत ज्यांना कच्चं खाल्ल्याने अनेक शारीरिक समस्या उद्भवतात.
कच्च्या मशरुममधील विषारी गुणधर्म शरीरासाठी धोकादायक असतात. मशरुम शिजल्याने ते नाहीसे होतात.
मांस नेहमी शिजवूनच खाल्ले पाहिजे. कच्चं मांस खाल्ल्याने संसर्गजन्य रोगांची लागण होऊ शकते.
अंडे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. पण, कच्चे अंडे खाल्ल्याने पोटासंबंधी गंभीर आजार होतात.
कोबी कच्ची खाल्ल्यावर जरी छान लागत असेल तरी खाऊ नका कारण कच्च्या कोबीमुळे पचनासंबंधी समस्या उद्भवतात.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)